तुमच्या बजेट मध्ये बसतील आणि उपयुक्त असे हे लॅपटॉप आहेत..
नवीन लॅपटॉप घ्यायचा असेल तर त्यासाठी पहिले ठरवा की तुम्हाला लॅपटॉप काय काम करायचं आहे? कशासाठी तुम्हाला लॅपटॉप घ्यायचा आहे, हे ठरवून मग तुम्ही लॅपटॉप चा विचार करू शकता. यात तुमचे वेगवेगळे कारण असू शकते ज्यासाठी तुम्हाला एक उत्कृष्ट आणि चांगला टिकाऊ लॅपटॉप निवडायचा आहे. खाली काही वेगवेगळ्या रीतीने आणि गरजेप्रमाणे लिस्ट बनवली आहे, ते पहा.
| Image Source: Google |
१. शाळेतील कामांसाठी किंवा मुलांना ऑनलाईन शिकवण्यासाठी
जर तुम्ही शाळेत शिकवण्यासाठी साधारण लॅपटॉप घेऊ इच्छिता किंवा तुमच्या मुलांना घरी बसल्या ऑनलाईन शिकवण्यासाठी लॅपटॉप घ्यायचा असेल, तर तुम्ही कमी किमतीत परंतु चांगली फीचर चे लॅपटॉप निवडू शकता. यात तुम्हाला २ जीबी रॅम आणि २०० - ३०० जीबी रोम स्टोरेज असलेले लॅपटॉप घेऊ शकता.
२. ऑफिस मधील कामे किंवा व्हिडीओ लेक्स्चरसाठी
ऑफिशिअल कामे किंवा साधारण वर्ड, ऑफिस, टूल साठी आणि पिपीटिस साठी, तसेच व्हिडिओ लेक्चर बनवायला अशा प्रकारचे काम करायचे असेल तर कमीत कमी किमतीत तुम्हाला ४ जीबी रॅम आणि २०० ते ५०० जीबी स्टोरेज असलेले कोणतेही लॅपटॉप तुम्ही निवडू शकता. ज्यात तुम्हाला भरपूर जागा आणि स्मूथली चालणार लॅपटॉप कमी किमतीतही मिळू शकतो.
३. फोटोशॉप, कोरल ड्रॉ आणि फोटो अल्बमसाठी
जर तुम्ही फोटोशॉप, पिक्सआर्ट, कोरल ड्रॉ, इत्यादी. फोटो किंवा अल्बम साठी लॅपटॉप शोधत आहात तर तुम्ही कोणताही चांगला प्रोसेसर असलेला लॅपटॉप निवडू शकता. ज्यात तुम्हाला कमीत कमी ४ जीबी रॅम आणि ५०० जीबी चे रोम असणारे कोणताही चांगला लॅपटॉप निवडू शकता. यात तुम्हाला स्मुथली लोड आणि चांगला परफॉर्मन्स मिळेल, ज्यामुळे अडकणे, हँग होणे किंवा इतर समस्या येणार नाहीत.
वाचा: मोबाईल इंटरनेट स्लो चालत असेल तर कॅशे क्लिअर करणे, APN सेटिंग्ज तपासणे, 4G/5G नेटवर्क निवडणे आणि इतर सोप्या उपायांनी इंटरनेटचा वेग वाढवा.
४. अभियंता, व्हिडीओ एडिटिंग आणि प्रोफेशनल कामासाठी
अभियंता, शास्त्रज्ञ, एडिटर किंवा प्रोफेशनल व्हिडिओ क्रिएटर जर असाल, तर तुम्हाला थोडे फार शिल्लक किंवा अधिक खर्च करावा लागेल, ज्यात तुम्हाला चांगला परफॉर्मन्स आणि पावरफुल प्रोसेसर मिळेल. ज्यामुळे तुमचे काम अधिक सोपे आणि सुरळीत होईल. कमीत कमी ८ जीबी किंवा त्यापेक्षा अधिक रॅम असलेले आणि ५०० ते १००० जीबी अर्थात १ टिबी रोम असलेले कोणतेही लॅपटॉप तुम्ही निवडू शकता. ज्यात ऑटोकॅड, व्हिडिओ एडिटिंग सॉ्टवेअर, कमी डेनसिटी चे गेम्स, सर्व इंजिनिअरिंग सॉफ्टवेअर यांसाठी तुम्हाला अशा लॅपटॉप ची गरज भासते. खूप कंपन्या आहेत जे अशा प्रकारचे लॅपटॉप बनवतात.
५. गेमिंग साठी किंवा हाय ग्राफिक्स गेमिंग परफॉर्मन्ससाठी
तुम्ही गेमिंग लॅपटॉप चा विचार करताय का? तर खूप असे लॅपटॉप आहेत, जे पावरफुल परफॉर्मन्स आणि दमदार प्रोसेसर सोबत मिळतात. ज्यात केवळ फक्त एवढंच गेमिंग केले जाते आणि खेळ खेळले जातात. जीटीए, पब्जी, एर फ्लाय, फायर स्ट्रोक यांसारखे जास्त ग्राफिक्स वाले गेम्स साठी हे लॅपटॉप असतात. गेमिंग लॅपटॉप शक्यतो उत्कृष्ट प्रोसेसर असणारा, जास्त रॅम असणारा, एकदम सॉफ्ट चालणार असावा लागतो. यात कमीत कमी ८ ते १६ जीबी रॅम असणारे परंतु हाय परफॉर्मन्स वाले लॅपटॉप असतात. ज्यांची किंमत खूप असते. असे लॅपटॉप तुम्ही गेमिंग साठी निवडू शकता.
खालील हा तक्ता नक्की पहा, तुम्हाला थोडक्यात अजून कळेल.
| Company | Min. RAM | Min. ROM | Processor | Graphics Card | Price ₹ |
|---|---|---|---|---|---|
| Dell, HP, Acer | 2 GB | 200 GB | C2D, i3 | NA | 20k - 22k |
| Dell, HP, Acer | 4 GB | 300 GB | C2D, i3 | NA | 24k - 27k |
| Dell, HP, Asus | 4 GB | 500 GB | i3, i5 | Min. 2 GB | 25k - 30k |
| Dell, HP, Asus | 8 GB | 800 GB | i5, i7, i9 | Min. 4 GB | 40k - 55k |
| Dell, HP, Asus | 12 GB | 1 TB | i7, i9 | Min. 8 GB | 70k - 1L |
निष्कर्ष:
नवीन लॅपटॉप खरेदी करताना केवळ किंमत किंवा ब्रँड पाहून निर्णय घेऊ नका. तुमच्या गरजा, बजेट, प्रोसेसर, RAM, स्टोरेज, बॅटरी बॅकअप, डिस्प्ले आणि विक्रीनंतरची सेवा (After-Sales Service) यांचा विचार करूनच योग्य लॅपटॉप निवडा. विद्यार्थी, ऑफिस कर्मचारी, फ्रीलान्सर किंवा गेमिंगसाठी प्रत्येकाची गरज वेगळी असते. त्यामुळे स्वतःच्या वापरानुसार योग्य मॉडेल निवडल्यास तुमची गुंतवणूक फायदेशीर ठरेल आणि लॅपटॉप अनेक वर्षे चांगली कामगिरी देईल.
Article Author
Mr. Amol Andhale
Amol Andhale is the Founder of Parikshit Abhyas and Parikshit News. He writes about Education, Career, Technology, Government Schemes, University Updates, Health and Lifestyle. His goal is to provide accurate and easy-to-understand information for students and readers.